सध्याच्या युगात एखाद्या माहितीचे संकलन
करण्यासाठी गुगल फाॅर्मचा फार उपयोग होतो.
यामुळे माहिती जलदरित्या जमा होवून त्याचे
संकलनही सहजरित्या होईल.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला
पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल
फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज
आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे
तयार करायचा हे शिकणार आहोत.
पाहिजे असलेल्या माहीतीसाठीचा गुगल
फॉर्म तयार करता आला पाहिजे. आज
आपण याठिकाणी गुगल फॉर्म कशा प्रकारे
तयार करायचा हे शिकणार आहोत.
1. गुगलफॉर्म तयार करण्यासाठी सर्वांत
महत्त्वाचे म्हणजे आपले G-mail ला खाते
असले पाहिजे.
2. युजर आय डी व पासवर्डच्या मदतीने
G- mail खाते Login करावे.
G- mail अकाउंट उघडल्यानंतर लाल बाणाने
हदाखविल्या प्रमाणे Google Drive वर क्लिक
करावे. त्यानंतर खालील इमेज मध्ये
दाखविल्या प्रमाणे Google Drive ओपन
होईल.
3. Google Drive ओपन झाल्यानंतर New
वर क्लिक करावे . त्यानंतर More मधील
Google Form वर क्लिक करावे
4. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे
Form Tittle मध्ये फॉर्मचा विषय टाईप करावा.
याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय
याठिकाणी पाठयपुस्तकांची मागणी हा विषय
टाईप केला आहे.
5. खालील इमेज मध्ये दाखविल्या प्रमाणे फॉर्म
मध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या मुदद्या
प्रमाणे माहिती Edit करावी. इमेज मध्ये बाणाने
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत. व शेवटी
Done वर क्लिक करावे.
6. वरील प्रमाणे इयत्ता 1ली ते 4 थी पर्यंतच्या
वर्गांची माहिती त्यात भरावी.
वरील इमेज मध्ये दाखविल्या बाणाने
दाखविलेल्या ठिकाणी बदल करावेत व शेवटी
Send form वर क्लिक करावे.
7. Send Form वर क्लिक केल्यानंतर खालील
विंडो ओपन होईल. Link to Share या खाली
आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती
आपल्या गुगल फॉर्मची लिंकची तयार होईल. ती
Copy करुन ठेवावी. त्यानंतर Done वर
क्लिक करावे.
8. त्यानंतर खालील इमेज मध्ये दाखविल्या
प्रमाणे आपला गुगल फॉर्म तयार होईल. त्यात
आपण आपल्याला पाहिजे असणारी माहिती
इतरांकडून भरुन घेवू शकतो. त्यासाठी आपण
Copy केलेली लिंक वेबसाईट, ब्लॉग, व्हॉटस
अप, फेसबुक, ईमेल ने इतरांकडे पाठवू शकतो.
इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा
इतरांकडून माहिती भरुन घेवू शकतो. जमा
झालेली माहिती आपणास संंकलन होवून
Excel फॉरमॅट मध्ये मिळते.
9. खाली दाखविलेल्या Insert Tab चा वापर
करुन आपण आपल्या गुगल फॉर्म आकर्षक
डिझाइन करु शकतो.
अशा प्रकारे गुगल फॉर्म ने माहीतीगोळा
करुन त्याचे संकलन केल्यास आपले काम जलद
होवून आपले कार्यालयीन बहुतेक कामे पेपरलेस
होतील व मोठया प्रमाणात कागदाची बचत
होवून पर्यावरणाची हाणी टाळता येईल.
खूप छान माहिती.
उत्तर द्याहटवा